पोलीस प्रवाह न्यूज
करमाळा : दि. १ –भारत मातेचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांचे संन्मानासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिले कारगिल भवन करमाळा शहरामध्ये उभारण्यात आलेले आहे ही खरोखर करमाळा तालुक्या सह सोलापूर जिल्ह्या साठी अभिमाना ची बाब आहे. प्रत्येक्ष कारगिल युद्धात वीर गती प्राप्त झालेले सैनिकांचे कुटुंबा साठी व आजी / माजी सैनिकांचे सुख सोयी साठी या भावनाची निर्मिती करण्यात आली आहे .सरकारी जागेत हे बांधकाम करण्यात आले आहे मागील महिन्यात च कारगील भवन चे इमारति चे काम पूर्ण झाले आल्यामुळे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला या मानसिकतेतुन त्यांनी गुंडा ना हाताशी धरून तालुक्यातील सैनिकांची अस्मिता म्हणून ओळखले जाणारे कारगील भवना वरती चिखल फेक करून खिडक्यांच्या काचेचे तोडफोड करण्यात आलेले आहे. ही बाब अतिशय निंदनीय असून या घटनेचा करमाळा तालुका आजी.- माजी सैनिक कल्याणकारी मंडळ तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो.
या माध्यमातून् पोलीस बांधवांना विनंती करतो अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावे व त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. राजकीय दबावापोटी किंवा काही कारणाने अशा गुंडांना पोलिसांनी अटक करण्यास विलंब केल्यास राज्यभरातून आजी -माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे हजारो जवान एकत्र येऊन करमाळा पोलीस स्टेशन समोर ठियया आंदोलन करणार असा इशारा करमाळा तालुका आजी -माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे सचिव किरण ढेरे मेजर यांनी दिलेला आहे. आजी- माजी सैनिकांची भावना दुखावल्याची घटना घडल्यामुळे करमाळा तालुक्यातील नागरिका कांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोशींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे











































