पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ३०- पुणे दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात कारवर दरड कोसळून त्यातील दगड महिलेचा अंगावर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ३० ऑक्टोबर रोजी पुण्याहून माणगावच्या दिशेने प्रवास करत असताना मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत आल्यावेळी फॉक्स वॅगन गाडी क्र. एम एच १४ एम एल ७४७९ वर डोंगरातून कोसळलेल्या दरडीमधून आलेला एक भला मोठा दगड गाडीतील सनरुफ मधून कारमध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या स्नेहल गोविंदास गुजराती, वय ४३ वर्ष, रा. चिंचवड पुणे यांच्यावर पडल्याने त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले तसेच माणगाव शहरातील गुजराती कुटुंबीय यांचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.



































