पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २६- राज्यात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या धर्तीवर रायगड जिल्ह्यातील नामवंत खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्याची प्रथा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू या श्रेणींतील जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२२–२३, २०२३–२४ व २०२४–२५ साठी जाहीर करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमीत माणगावच्या ऋषिकेश मालोरे यांचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षकांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान व्हावा, तसेच भावी पिढीतील युवक-युवतींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येत आहेत. २०२२– २३ या वर्षासाठी उत्कृष्ट खेळाडू ओंकार जितेंद्र पवार (कुस्ती), सलोनी पद्माकर मोरे (पॉवरलिफ्टिंग), उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्रवीण खुटारकर (अॅ्थलेटिक्स) यांची निवड करण्यात आली आहे. २०२३– २४ या वर्षासाठी उत्कृष्ट खेळाडू सार्थक मारुती इंद्रे (वॉटरपोलो), अमृता ज्ञानेश्वर भगत (पॉवरलिफ्टिंग श्रद्धा साईनाथ तळेकर (जिम्नॅस्टिक्स) यांना जागतिक स्पर्धेत सहभागासाठी थेट पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक सचिन शंकर माळी (तायक्वांदो), उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू श्रेयस दिपक पराडकर (जलतरण) यांना जाहीर झाला आहे.
२०२४ – २५ या वर्षासाठी उत्कृष्ट खेळाडू ऋषिकेश पुंडलीक मालोरे (वुशू),अन्वी विक्रम राठोड (रायफल शूटिंग),उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक अरविंद रावण शिंदे (अॅकक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक्स),उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू प्रमोद कुमार (टेबल टेनिस) यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय श्रद्धा साईनाथ तळेकर हिने अॅलक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक्स या खेळात केलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे तिला थेट जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या तीन वर्षांचे जिल्हा क्रीडा पुरस्कार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रु.१० हजार असे आहे.





































