पोलिस प्रवाह न्युज
माणगांव – दि. २४- तालुक्यातील सर्व देशप्रेमी नागरिक व माजी सैनिक यांच्या वतीने शहरामध्ये केंद्र सरकार व भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्यानंतर राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेल्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी व भारतीय सैन्याच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दिनांक २४ मे रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा यात्रेला माणगावकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन शेकडो नागरिक तिरंगा यात्रेत सहभागी झाले.

माणगांव बस स्थानकापासून कचेरी रोड मार्गे शहीद यशवंतराव घाडगे स्मारकापर्यंत हातात तिरंगा झेंडा घेऊन ‘भारत माता कि जय’च्या उदघोशात यात्रा संपन्न झाली. यानंतर शहीद घाडगे स्मारकाजवळ माणगांव तालुक्यातील माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय व सिंदूर ऑपरेशनमध्ये सहभागी असणारे माणगांवचे सुपुत्र जवान रुपेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तरुणवर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. माजी सैनिक संघटनेचे माजी अध्यक्ष विष्णू सावंत, सुरेश गायकवाड, सचिव हृषीकेश शिंदे, विचारे, प्रकाश मोरे यांच्यासमवेत सर्व माजी सैनिक व कुटुंबीय त्याचप्रमाणे व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी सुरेश जैन, भाजपा युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, तालुकाध्यक्ष परेश सांगले, युवराज मुंढे, महिला मोर्चा प्रदेश सचिव यशोधरा गोडबोले, गोविंद कासार, सुधीर म्हामुणकर, बाबुराव चव्हाण, रामदास पुराणिक, माजी पंचायत समिती सदस्या रचना थोरे, अनिल दांडेकर, निखिल साळुंखे, अमोल पवार, रुपाली कासारे, वैशाली मढवी, ओमकार गायकवाड, जितेश गुगळे, स्वराज्य अकॅडमीचे संस्थापक परेश कोटकर, कमांडो अकॅडमीचे तरुण तरुणी व माणगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





































