पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव, दि. ५ – जत्रा महोत्सव मध्ये माणगांव आयडॉल २०२५ शनिवार दि. ३ मे रोजी संपन्न झाला. यामध्ये गाणी, डान्स आणि अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथमेश महाडिक, महाड (गायन), व्दितीय क्रमांक- वृतिका शिंदे, पाली (डान्स), तृतीय क्रमांक- राजवीर मोरे, माणगांव (अभिनय) आणि उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक – गायत्री सुतार, महाड (गायन) यांनी पारीतोषिक पटकावले.
विजेत्यांना उद्योजक सचिन देसाई, रामनारायण मिश्रा, अशोक धारीया, समाजसेविका सुवर्णा जाधव आणि माणगांव मधील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डाॅ. श्रीकांत वैद्य यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण चित्रपट अभिनेते नितीन बोधारे, माणगांव तालुक्यातील कालवण गांवचा सुपुत्र चला हवा येवुद्या फेम सुप्रसिद्ध बालकलाकार साईराज सांगले याचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मानसी राणे (मुंबई), मा.डाॅ.मुरलीधर वाणी, निलीमा काप, धीरज रजपुत, राज यादव, राॅणी पठार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अष्टविनायक कला अकादमी डॉ. अजय मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.




































