पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ६- नवीन वर्षाच्य सुरुवातीला दि. ४ जानेवारी रोजी गोरेगाव येथे श्री स्वामी समर्थ पायदळ पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने ‘चॅरिझेन फाउंडेशन’च्या वतीने भाविकांसाठी अल्पोपहार आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून भक्ती आणि सेवेचा अनोखा संगम साधला. दरवर्षीप्रमाणे निघालेल्या या पायदळ यात्रेत रायगड जिल्ह्यातील शेकडो भाविक सहभागी झाले होते.
फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन एन. एस. रंधावा यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या टीमने संपूर्ण मार्गावर भाविकांची सेवा केली. “स्वामींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची सेवा करणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो,” अशी भावना कॅप्टन रंधावा यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमात सतीश काळे, सचिन वाघ, विलास आठवले, किशोर झेंसे, विजयश्री कराड, अनिल कराड, सुजाता इंगळे आणि फाउंडेशनच्या इतर सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. संस्थेच्या या सामाजिक कार्याचे गोरेगाव परिसरातील नागरिक आणि वारकऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे.




































