पोलीस प्रवाह न्युज
श्रीवर्धन, दि. २८-शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा ठाकरी बाणा आणि त्यांच्या सारख्या विचारधारा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे आहेत. आज श्रीवर्धन येथे तालुक्याचा आढावा घेण्यासाठी आलोय. २०२९ सालातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणी करायची आहे, असे नवनिर्वाचित रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष योगेश परुळेकर यांनी आढावा बैठकी दरम्यान सांगितले.
श्रीवर्धन तालुक्यातील विकासकामा संदर्भात सत्ताधाऱ्यांनी खोटी आश्वासने देऊन विकासकामांचा आभास निर्माण केला व अनेक ठिकाणचा निधी लंपास केला.vअसे बरेच विषय आमच्या कानावर आले आहेत. असे सांगताना यामध्ये सत्ताधाऱ्यां बरोबरच विरोधक ही सामील आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही, इतर विरोधकांबाबतीत मी बोलतोय असे स्पष्टीकरण योगेश परुळेकर यांनी केले.
रायगड जिल्हा संपर्क प्रमुख योगेश परुळेकर आणि रायगड जिल्हा सह संपर्क अध्यक्ष राजन येरूणकर यांनी नाराज होऊन इकडे तिकडे गेलेले कार्यकर्ते पुन्हा मनसे कडे वळतील. आमच दुर्लक्ष झालं असेल काही चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधारण्यासाठी आम्ही इथे आलोय.श्रीवर्धन तालुक्यातील राजकारण हे पैश्यांभोवती फिरतय याचा खेद व्यक्त करताना श्रीवर्धन तालुक्यात संपर्क वाढवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खंबीर नेतृत्व तयार करणे व संघटना बळकट करणे हे एक महत्त्वाचे काम असेल असा विश्वास योगेश परुळेकर आणि राजन येरूणकर यांनी व्यक्त केला. मंगळवार दिनांक २८ रोजी दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या आढावा बैठकी वेळी दक्षिण रायगड उपजिल्हा अध्यक्ष मृदास तोंडलेकर, माजी श्रीवर्धन तालुकाध्यक्ष राजेश लोहार, प्रभारी श्रीवर्धन तालुका अध्यक्ष संदेश कातळकर, ओमकार चोगले आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.










































