पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १४- भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माणगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माणगाव नगरपंचायत पाणीपुरवठा शिक्षण व सामजिक न्याय सभापती तथा नगरसेवक अजित तार्लेकर यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक वर्ष २०२६ – २७ मध्ये माणगाव शहरात इयत्ता पाचवी व सातवी मधील शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल व दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या एकूण १० विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भास्करदादा कामेरकर विद्यालय माणगाव, लीड स्कूल माणगाव, एस एस निकम स्कूल माणगाव, श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कूल माणगाव या शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील ५ विद्यार्थ्यांचा ओम राकेश जाधव, आर्या प्रतीक भोसले, भाविका चंद्रकांत अंबूर्ले, स्वरूप रोहिदास पवार, अर्चित स्वप्निल विद्वांस यांचा सन्मान स्वतः नगरसेवक अजित तार्लेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी ॲड मयुरा तार्लेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जावून केला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आदर्श प्राथमिक विद्यामंदिर म्हणजेच जंगम शाळा माणगाव मधील विद्यार्थिनी ईश्वरी अमोल कदम ही ८९.३३% गुण प्राप्त करून रायगड जिल्ह्यात प्रथम आली आहे. तिच्यासह जंगम शाळेतील विघ्नेश बालाजी बनसोडे तालुक्यात दुसरा, अथर्व जोतिबा सावंत तालुक्यात पाचवा, युवराज प्रशांत पाटील तालुक्यात पाचवा, अर्चित स्वप्निल विद्वांस तालुक्यात बारावा, देविका रुपेश जाधव.या सर्व विद्यार्थ्यांचे नगरसेवक अजित तार्लेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून सन्मानपत्र व पुष्पगच्छ देऊन सन्मान केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी युवासेना शहर प्रमुख अजिंकेश जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख इब्राहिम करेल, शिवसेना उपशहर प्रमुख अभिजित घोणे, युवासेना शहरप्रमुख अंकित कदम उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याचे जंगम शाळा येथील नियोजन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण जंगम (गुरूजी), मुख्याध्यापक अमोल जंगम व शाळेतील सर्व शिक्षिकांनी केले होते.











































