पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. १७- पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस स्टेशनने दमदार कामगिरी करत चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादीस परत मिळवून दिला आहे.
करमाळा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा क्रमांक 788 / 2024 कलम भा. न्या.सं.कलम 305(अ) अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना करमाळा पोलीसांनी आरोपी रामेश्वर जंगल्या भोसले राहणार पांडेगव्हाण तालुका आष्टी जिल्हा बीड यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्ह्यात चोरी केलेला सोन्याचा मुद्देमाल स्वतःच्या ताब्यात असल्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपीने सदरचा सोन्याचा मुद्देमाल हा काढून दिला असून पोलीसांनी तो मुद्देमाल हस्तगत केला. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 07 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी व 08 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन फुले.किंमत रुपये 210000(दोन लाख दहा हजार रुपये)/- इतकी आहे.
सदर हस्तगत मुद्देमाल हा मा. न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी अभिजीत जीवन सरडे राहणार कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांना परत देण्यात आला आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास माननीय अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण , मा. प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. अंजना कृष्णा व्ही.एस. सहायक पोलीस अधीक्षक करमाळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रणजीत माने पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस ठाणे, API/गिरीजा मस्के, मनीष पवार, मिलिंद दहीहंडी, अमोल रणदिल, अर्जुन गोसावी, संदीप कवडे, रविराज गटकुळ यांनी केला आहे.
त्याच प्रमाणे दुसऱा गुन्हा करमाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 926/2025 भारतीय न्याय संहिता-2023 चे कलम 74,75(2),316(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल त्या मध्ये 1)4 ग्रॅम 990 मी.ली. वजनाची सोन्याची पीळ्याची अंगठी हे मा. अतिरिक्त सत्र न्यायदंडाधिकारी साहेब बार्शी यांचे आदेशान्वये आज रोजी फिर्यादी नामे मन्नाबी हरून शेख, राहणार करमाळा यांना सुपूर्द करण्यात आली. पोलीस प्रशासन नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी सदैव कटिबद्ध असून गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनीही याबाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी आपले आजूबाजूला आपल्या काही गुन्हे घडत असतील किंवा अवैद्य व्यवसाय सुरू असतील तर कृपया ताबडतोब करमाळा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा यांची नावे गुपित ठेवली जातील
असे आव्हाहण करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केलेले आहे.









































