पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ५- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सांसद सदस्य दत्तक योजनेंतर्गत गोरेगांव शहराला दत्तक घेऊन या वर्षापासून पुढील पाच वर्षात गोरेगांव शहराचा विकासात्मक कायापालट करणार असल्याची ग्वाही रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी गोरेगाव येथील प्रचार सभेत दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोरेगाव येथील राजमाता जिजाऊ मैदानावर संपन्न झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुभाष केकाणे, दिलीप शेठ, मुख्तार वेळासकर, सरपंच जुबेर अब्बासी, कानू अण्णा उचाटे, राजू शिर्के, माजी जि. प. सदस्या राधिक तटकरे , माजी सभापती अरुणा शेठ, चिंचवली सरपंच नंदू पारावे, उपसरपंच किशोर तटकरे, गोरेगांव उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर, माजी उपसरपंच विनोद बागडे, उणेगांव सरपंच शुभांगी शिर्क, यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी झालेल्या प्रचार सभेदरम्यान प्रदेश अबू बकर दाऊद गोडमे, जरीना बूबकर गोडमे, अयुष सांगले, असद सांगले, दिलदार सांगले, संतोष सत्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना खा. तटकरे यांनी येत्या पाच वर्षात गोरेगाव परिसरात बहुजन समाजासाठी वास्तु उभारण्याला आपण प्राधान्य देणार असून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संत रोहितस समाज सभागृह उभारणे हे आपले कर्तव्य असल्याच सांगितले. एनडीएमध्ये सामील झालो असलो तरी सर्व धर्मियांचा सेवा करण्याचा शब्द खा . तटकरे यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, रोजगाराची संधी मिळण्यासाठी रायगडमध्ये विशेषत: गोरेगाव -लोणेरे परिसरात प्रदूषण विरहित कारखाने आणणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारकडून निधी आणायचा असेल तर स्थानिक पातळीवर साखळी निर्माण होणं आवश्यक आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या उमेदवारांच्या पाठिशी उभं राहण्याचे काम करेल, असे सांगून सुनीत तटकरे यांनी- यापूर्वी गोरेगावात् इतकी प्रचंड अपस्थिती पाहिली नव्हती. गोरेगाव आणि लोणेर येथील विकासकामे प्रामाणि पण केली असल्याचे म्हणाले. गोरेगांव रेल्वेटेशनच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम खासदार म्हणून केले असून उद्याच्या काळात गोरेगाव रेल्वे स्थानकाचे काम अधिक उज्वल करण्याचे प्रयत्न मी करेन याची ग्वाही दिली.
एक वर्षात विष्णू तलावात शिवरायांचा पुतळा उभारण्याचे तसेच राजमाता मैदानावर राजमाता जिजाऊंचा पुतळा उभारण्याच काम मी करणार आहे कारण मी जे बोलतो ते करतो. ऐतिहासिक राजमाता मैदानावर जिजाऊंचा पुतळा उभारणे हे माझे कर्तव्य आहे ही दोन्ही कामे डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे वचन देतो असे तटकरे यावेळी म्हणाले .लोकसभा सदस्य म्हणून सर्व धर्मीयांची सेवा करेन हा माझा शब्द मी या निमित्ताने देतो, असे ते यावेळी म्हणाले.
खा. सुनील तटकरे यांनी यावेळी गोरेगाव परिसरात प्रदूषण विरहित कारखाने आणण्यावर आपण भर देणार आहोत. ज्यामुळे रायगडमधील लोकांचे रोजगारासाठी स्थलांतर थांबवता येईल. लोणेरे येथील उड्डाण पुलासाठी आवश्यक तो पाठपुरावा आपण केला असल्याचेही त्यांनी सांगितले. भाषणाच्या शेवटी त्यांनी भारत गोरगांवकर यांना स्थानिक कार्यकर्ता म्हणून जिल्हा परिषद/स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. “विकासात्मक दृष्टीकोन ठेवून काम करणारा कार्यकर्ता” म्हणून त्यांनी त्यांची ओळख करून दिली.
यावेळी निवडणुकीसान उभे राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मते देवून निवडून देण्याचे आवाहन केले. सरपंच जुबेर अब्बासी यांनीही मनोगत व्यक्त केल सूत्रसंचलन चंद्रकांत गोरगांवकर यांनी केले .



































